Deepak Kesarkar यांनी विरोधकांना फटकारले, राजकारण करणं म्हणजे काय? स्पष्टच सांगितलं

| Updated on: Sep 08, 2023 | 4:11 PM

VIDEO | अहमदनगरमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केलेल्या उद्धव ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्यावरून दीपक केसरकर यांची सडकून टीका, 'काही जणांकडून शंभर टक्के राजकारण केलं जात आहे.'

कोल्हापूर, ८ सप्टेंबर २०२३ | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केली आहे. कोल्हापुरात बोलत असताना ते म्हणाले, ‘ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण हायकोर्टात टिकवून दाखवलं, त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही. एखाद्या पोलिसांकडून चूक झाली तर फडणवीस यांना धारेवर धरलं जातं याला राजकारण म्हणतात. इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या नाहीत का? त्यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक झाली, आम्ही यावर टीका केली नाही. निवडणूक या घ्याव्याच लागतात. दुष्काळ आला तरी निवडणूक घ्यावंच लागेल. मात्र, याचा कोणताही परिणाम आपल्या कामावर होता कामा नये. याची काळजी शिंदे सरकार घेतंय. काम कसं करायचं आमच्या तासन् तास बैठका होतात. ज्यांना राजकारण करायचं आहे ते बातम्या देतात. ज्यांना काम करायचं ते काम करतात. काम करणाऱ्या माणसांवर टीका केली तरी त्याचे उत्तर कामाने दिले पाहिजे आणि तेच आमचं सरकार करतंय.’

Published on: Sep 08, 2023 04:10 PM
Manoj Jarange Patil यांचे कुटुंबीय आंदोलनस्थळी; आई म्हणाल्या, ‘माझ्या बाळाला…’
‘ओबीसी बांधवांनी आमच्या मागणीला विरोध करू नये, कारण…’, विनोद पाटील यांनी काय केली विनंती?