Video : उद्धव ठाकरे आमच्या कुटुंबाचा भाग- दीपाली सय्यद

| Updated on: Jul 08, 2022 | 12:21 PM

शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यामुळे आता कोणता झेंडा हाती घेऊ म्हणणाऱ्या (Deepali Sayyad) दीपाली सय्यद यांनी (Rebel MLA) बंडखोर आमदारांवर चांगलाच निशाना साधला आहे. उद्धव ठाकरे हे आमच्या कुटुंबासारखे आहेत. त्यामुळे चिन्हाबाबत जे व्हायचे ते होऊ द्या पण पक्ष प्रमुखांचे आदेश महत्वाचे असल्याचे सांगत त्यांनी किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यावरुन बंडखोर आमदारांना डिवचले आहे. किरीट सोमय्या […]

शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यामुळे आता कोणता झेंडा हाती घेऊ म्हणणाऱ्या (Deepali Sayyad) दीपाली सय्यद यांनी (Rebel MLA) बंडखोर आमदारांवर चांगलाच निशाना साधला आहे. उद्धव ठाकरे हे आमच्या कुटुंबासारखे आहेत. त्यामुळे चिन्हाबाबत जे व्हायचे ते होऊ द्या पण पक्ष प्रमुखांचे आदेश महत्वाचे असल्याचे सांगत त्यांनी किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यावरुन बंडखोर आमदारांना डिवचले आहे. किरीट सोमय्या हे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीही बोलणार आणि ते तुम्ही ऐकूण घेणार. हीच शिवसेना (Shivsena) तुमच्या रक्तात भिनली आहे का म्हणत मेलेल्या आईचं दूध पिऊन सत्तेत गेलात का? असेही खडे बोल दीपाली सय्यद यांनी बंडखोरांना सुनावले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना तोडुन लढण्यापेक्षा जोडुन लढली तर शिवसैनिकाला आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

 

Published on: Jul 08, 2022 12:21 PM
उद्धव ठाकरेंनी मोदींशी चर्चा करून मार्ग काढावा- आमदार शंभूराज देसाई
Video : झुंडशाहीतून शिंदे-भाजप सरकार स्थापन झालं – संजय राऊत