हार असो वा जीत… महायुतीत कायम टार्गेट ‘अजित’? लोकसभेला भाजप अन् विधानसभेला शिवसेनेकडून?

| Updated on: Dec 03, 2024 | 11:12 AM

लोकसभेच्या पराभवाचं खापर भाजपच्या अनेक लोकांनी अजित पवारांवर फोडलं. त्यानंतर आता विधानसभेत मिळालेल्या कमी जागांवरुन शिंदेंच्या नेत्यांकडून अजित पवारांना खलनायक ठरवलं जातंय. एरव्ही बार्गेनिंगमध्ये दादागिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजितदादांनी ना मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितलाय, ना ही त्यांनी गृहखात्यासाठी आग्रह धरलाय.

लोकसभा निवडणुकीला महाराष्ट्रात महायुतीचा पराभव झाल्यानंतर भाजपमधून काही जणांनी अजित पवारांना कारणीभूत ठरवलं होतं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळालाय. असं असलं तर शिंदेंच्या शिवसेनेकडून आता टार्गेट केलं जातंय. लोकसभेच्या पराभवाचं खापर भाजपच्या अनेक लोकांनी अजित पवारांवर फोडलं. त्यानंतर आता विधानसभेत मिळालेल्या कमी जागांवरुन शिंदेंच्या नेत्यांकडून अजित पवारांना खलनायक ठरवलं जातंय. एरव्ही बार्गेनिंगमध्ये दादागिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजितदादांनी ना मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितलाय, ना ही त्यांनी गृहखात्यासाठी आग्रह धरलाय. लोकसभेत वाट्याला फक्त 4 जागा येवूनही दादांचा गट रुसला नाही आणि विधानसभेत फक्त 59 जागा मिळूनही नाराजीचा एक शब्दही काढला नाही. पण तरी महायुतीत पराभवाचे खलनायक आणि मोठ्या विजयातले अडसरही अजित पवारच असल्याची विधानं होतायत. दरम्यान, महायुतीत शिंदेंच्या 81 पैकी 57 जागा आल्या. स्ट्राईक रेट जवळपास ७० चा राहिला. 59 पैकी 41 जागा जिंकणाऱ्या अजित पवारांचा स्ट्राईक रेट जवळपास 69 होता. आणि 149 लढून 132 जागा मिळवणाऱ्या भाजपचा स्ट्राईक रेट जवळपास 80 राहिला. या स्ट्राईक रेटनुसार जर भाजप स्वबळावर 170 जागा लढली असती तर 145 च्या बहुमताचा आकडा त्यांनी एकट्यानं पार केला असता., पण अद्याप शिंदे-दादांच्या नेत्यांच्या वादात भाजपनं उडी घेतलेली नाही. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Dec 03, 2024 11:12 AM