सैन्य भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा; 50 हजार अग्निवीरांची होणार भरती

| Updated on: Jun 14, 2022 | 1:45 PM

सैन्यदलात चार वर्ष काम करुन तरुणांना देशसेवेची संधी दिली जाणार आहे. यासाठी 50 हजार अग्निवीरांची नियुक्ती केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेत ही मोठी घोषणा केली.

सैन्यदलात चार वर्ष काम करुन तरुणांना देशसेवेची संधी दिली जाणार आहे. यासाठी 50 हजार अग्निवीरांची नियुक्ती केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेत ही मोठी घोषणा केली. तरुणांसाठी सैन्यभरतीची ही सुवर्णसंधी असल्याचं मानलं जातंय. अग्निपथ योजनेअंतर्गत देशातील हजारो तरुणांना सशस्त्र दलात काम करायला मिळणार आहे. तरुणांना यासाठी विशेष प्रशिक्षणासह त्यांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक मोबदला देखील दिला जाणार आहे. चार वर्ष सेवेनंतर अनेक सुविधांचा लाभ तरुणांना दिला जाईल, अशी घोषणा राजनाथ सिंह यांनी यावेळी केली. ते दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Mumbai Metro Shed | मुंबईतील कांजूरच्या मेट्रो कारशेडच्या जागेचा तिढा कायम
पंतप्रधान मोदींचं लोहगाव विमानतळावर आगमन