Chandrakant Patil | आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या 5 जागाही आल्या नसत्या – चंद्रकांत पाटील

| Updated on: Oct 04, 2021 | 7:52 PM

देगलूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीवर राज्यातील राजकीय वातावरण तापायला आता सुरुवात झालीय. देगलूरमधून भाजपनं शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना मैदानात उतरवलं आहे. साबणे यांनी शिवबंधन सोडत आज चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या भाजप मेळाव्यात चंद्रकातं पाटील यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय.

आम्ही पंढरपूर जिंकून दाखवलं. तुम्हा तिघांच्या विरोधात ग्रामपंचायती जिंकल्या, साखर कारखाने जिंकले. कराडच्या कृष्णा कारखान्यात 21 पैकी 21 जागा आम्ही जिंकल्या. तुम्ही कितीही एकत्र आले तरी आम्ही देगलूरची जागा जिंकणारच. आम्ही हे राज्य विजयी केलं नव्हतं. मात्र, विधानसभेला सर्वाधित मतदान आम्हाला आहे. आम्हाला 20 आमदार कमी पडले आणि आम्हाला सर्व ठिकाणी धोका झाला. आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या पाच जागाही आल्या नसत्या, अशा शब्दात पाटील यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलं आहे.

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्यास भाजपने पहिला नंबर घेतलाय. आपण प्रचारातही बाजी मारली आहे. 7 तारखेला ते एक अर्ज भरतील. 8 तारखेला मोठी रॅली काढून सुभाष साबणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात येईल. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येतील, अशी माहिती यावेळी पाटील यांनी दिलीय.

Aryan Khan | आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, किल्ला कोर्टचा निर्णय
Video : 36 जिल्हे 72 बातम्या | 6.30 PM | 4 October 2021