राज्य सरकार अन् जरांगे यांच्या शिष्टमंडळाची सह्याद्रीवर अडीच तास बैठक, काय झाली चर्चा?

| Updated on: Sep 09, 2023 | 8:35 AM

VIDEO | मनोज जरांगे यांच्या वतीने ११ जणाचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर उपस्थित होते, बैठकीत काय झाली नेमकी चर्चा? एकनाथ शिंदे यांनी काय दिली माहिती?

मुंबई, ९ सप्टेंबर २०२३ | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची आणि राज्य सरकारची काल रात्री सह्याद्रीवर बैठक झाली. साधारण अडीच तास ही बैठक चालली. या बैठकीमध्ये मनोज जरांगे यांच्या वतीने ११ जणांचं शिष्टमंडळ या बैठकीत हजर होतं. या बैठकीत झालेल्या निर्णयाचा बंद लिफाफा अर्जून खोतकर यांच्या हाती देण्यात आला आहे. तर बैठकीमधला हा बंद लिफाफा गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज सकाळी ११ वाजता मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाला सोपावण्यात येणार आहे. मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर मनोज जरांगे यांच्याकडून महिनाभराचा कालावधी मागितला जाणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जरांगे पाटील यांना ठोस लेखी आश्वासन देण्यात येणार आहे. ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सगळा विषय मागासवर्गीय आयोगाकडे पाठवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Published on: Sep 09, 2023 08:30 AM
‘ओबीसीच्या अस्मितेला धक्का लावाल तर…’, जरांगे पाटील यांच्यासह शिंदे सरकारला कुणाचा इशारा?
MLA Disqualified | शिवसेना आमदार अपात्र प्रकरणासंदर्भातील मोठी बातमी, ‘या’ दिवशी होणार सुनावणी