राजधानी दिल्लीत गेल्या 12 वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक थंडी, दाट धुक्याचा रेल्वे अन् विमानसेवेला फटका
भारतातील उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, या राज्यातील अनेक शहरांमध्ये दाट धुकं पाहायला मिळत आहे. दिल्ली मधील जनपथ मार्गावरही दाट धुकं असल्याने वाहन चालकांनी काळजी घ्यावी असे आवाहन दिल्ली पोलीस व प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली, ३१ जानेवारी २०२४ : सध्या संपूर्ण राज्यभरात कडाक्याची थंडी आहे. दरम्यान उत्तर भरतातील थंडी ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र अनेक शहरांमध्ये अजुनही धुकं पाहायला मिळत आहे. तसेच भारताची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये आजची दृश्यमानता 50 मीटर वर पोहचली आहे. अगदी दाट धुकं दिल्लीमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना 40 ते 50 मीटरच्या पुढील दृश्य पाहण्यास अडथळा येत आहे. तसेच भारतातील उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, या राज्यातील अनेक शहरांमध्ये दाट धुकं पाहायला मिळत आहे. दिल्ली मधील जनपथ मार्गावरही दाट धुकं असल्याने वाहन चालकांनी काळजी घ्यावी असे आवाहन दिल्ली पोलीस व प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. दरम्यान 2024 मधील थंडी ही मागील 12 वर्षांच्या तुलनेत सर्वात जास्त थंडी असून ती मोठ्या प्रमाणात होती असं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र राज्यभरातील थंडी ओसरत असून धुकं हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, विमानची उड्डाणं आणि लँडिंग, रेल्वे वाहतूक या सर्वांवर या धुक्याचा परिणाम झाला आहे, तसेच अनेक एक्सप्रेस ज्या दक्षिण आणि ईशान्य भारतातून येणार आहेत त्या देखील उशिरा धावत आहेत.