दिल्ली मेट्रो परिसरात अरविंद केजरीवाल यांच्यासाठी धमकीचा मेसेज, आरोपी CCTV मध्ये कैद
दिल्ली मेट्रोमध्ये एका व्यक्तीने अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देणारे मेसेज लिहिले आहेत. आरोपी हा उच्चशिक्षित असून एका नामांकित बँकेत काम करतो. दिल्ली मेट्रो परिसरात अरविंद केजरीवाल यांना धमकीचा मेसेज लिहिणारा समोर आल्याची माहिती आहे. अरविंद केजरीवाल यांना धमकीचा मेसेज लिहिणारा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देणारे मेसेज लिहिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली मेट्रोमध्ये एका व्यक्तीने अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी देणारे मेसेज लिहिले आहेत. आरोपी हा उच्चशिक्षित असून एका नामांकित बँकेत काम करतो. दिल्ली मेट्रो परिसरात अरविंद केजरीवाल यांना धमकीचा मेसेज लिहिणारा समोर आल्याची माहिती आहे. अरविंद केजरीवाल यांना धमकीचा मेसेज लिहिणारा आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अरविंद केजरीवाल यांना धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव अंकित गोयल असं आहे. हा आरोपी बरेलीचा रहिवासी असल्याची सूत्रांची माहिती आहे. अंकित गोयल हा बँकेचा कर्मचारी असून त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, 19 मे रोजी पटेल नगर आणि राजीव चौक मेट्रो स्टेशनवर इंग्रजीत केजरीवाल यांच्या विरोधात धमकीचा संदेश लिहिला होता. अरविंद केजरीवाल यांच्या धमकी प्रकरणी आपने भाजपवर आरोप केले होते. मात्र आता अरविंद केजरीवाल यांना धमकीचा मेसेज लिहिणारा सीसीटीव्हीमध्येच कैद झाल्याचे समोर आले आहे.