Chandrapur | चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळला डेल्टा प्लस कोरोनाग्रस्त रुग्ण
सुमारे दोन आठवड्यांपूर्वी रँडम चाचणीत ही महिला बाधीत आढळली होती. तिला विलगीकरणात पाठविण्यात आले होते. संशयानंतर नमुने दिल्लीला पाठविले होते.
चंद्रपूर : जिल्ह्यात पहिल्यांदाच डेल्टा प्लस कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील 41 वर्षीय महिला रुग्ण या विषाणूने बाधित असल्याचे उघड झाले आहे. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी रँडम चाचणीत ही महिला बाधीत आढळली होती. तिला विलगीकरणात पाठविण्यात आले होते. संशयानंतर नमुने दिल्लीला पाठविले होते. या चाचणीचा अहवाल आला असून त्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटची पुष्टी झाली आहे. प्रशासनाने या नव्या बदलाची नोंद घेत आरोग्य विभागाला खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.