महाराष्ट्रात आरक्षणावरुन सुरु वादात बिहारनं काय काढला तोडगा? जातगणनेची का होतेय मागणी?
VIDEO | बिहार देशातलं पहिलं राज्य ज्याने कोणता समाज किती आहे, याची आकडेवारी जाहीर केली. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातूनही जातगणनेची मागणी जोर धरू लागली आहे, राज्याची जातगणना का केली जाते? जातगणना करण्यामागचा इतिहास नेमका काय आहे? जातगणनेआडून राजकीय खेळी खेळली जात आहे का?
मुंबई, ३ ऑक्टोबर २०२३ | कोणता समाज किती आहे, याची आकडेवारी जाहीर करणारं बिहार देशातलं पहिलं राज्य ठरलंय. यानंतर आता महाराष्ट्रातही जातगणनेची मागणी जोर धरतेय. जातगणनेची मागणी का होते, नितीश कुमार याआडून राजकीय खेळी खेळता आहेत का? अशी चर्चा होत आहे. महाराष्ट्रात आरक्षणावरुन सुरु असणाऱ्या वादात बिहार राज्यानं एक तोडग्याचा मार्ग दाखवलाय. नेमकं कोण किती टक्के आहे आणि कुणाला किती आरक्षण हवं.,यासाठी कायम जातीय जनगणनेची मागणी होत आली आहे. बिहारनं जातीय जनगणना करुन त्याचे आकडे जाहीर केलेय आहेत, असं करणारं बिहार हे देशातलं पहिलं राज्य बनलंय. यानंतर आता महाराष्ट्रातही जातीय जनगणनेची मागणी होऊ लागली आहे. शरद पवार यांच्यासह विजय वडेट्टीवार यांनी देखील जातीय जनगणनेची मागणी केली आहे.
बिहारची एकूण लोकसंख्या १३ कोटींच्या वर गेलीय, याचा अर्थ महाराष्ट्राची लोकसंख्या जी आपण ढोबळमानानं 13 कोटी म्हणतो, ती सुद्धा प्रत्यक्षात वाढलेली आहे. कारण २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी होती., ते प्रमाण १२ वर्षानंतर कैक पटीनं वाढलेलं आहे. बिहारची जनगणना महाराष्ट्रासाठी यासाठी महत्वाची आहे., कारण वारंवार जातीय जनगणनेची मागणी केली जात आहे. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट