पुलाअभावी ग्रामस्थांचा नदीपात्रातून खडतर प्रवास, 75 वर्षांपासून नागरिकांची ‘ती’ मागणी प्रलंबित
VIDEO | नांदेड जिल्ह्यातील मन्याड नदीवरून जाण्या-येण्यासाठी मार्ग नसल्यानं गावकऱ्यांचा नदीपात्रातून खडतर जीवघेणा प्रवास
नांदेड, ८ ऑगस्ट २०२३ | नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कौठा इथल्या ग्रामस्थांची शोकांतिका समोर आली आहे. या गावतील ग्रामस्थांची मन्याड नदीवरून रोजची कसरत सुरू आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता नदी ओलांडून जावं लागतं. मात्र या नदीवर कोणताही पूल किंवा रस्ता नसल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कौठा इथल्या ग्रामस्थांची मन्याड नदीवरच्या पुलाची मागणी 75 वर्षांपासून प्रलंबित आहे, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना नदीपात्रातूनच शेतीकडे जावं लागतंय. नदीला पूर आला की शेतकऱ्यांच्या कामांचा खोळंबा होतोय. या ठिकाणी पूल झाला तर कौठा, बारुळ, राहटी, वरवंट, मंगनाळी, कळका बोरी, अंबुलगा मार्ग अहमदपूरला जाण्यासाठी जवळचा रस्ता शक्य होणार आहे. मात्र आजवर अनेक राजकीय नेत्यांनी केवळ आश्वासन आणि उदघाटन केली मात्र पुलाचे काम अद्याप सुरू झालेल नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.