MSRTC | एसटी कामगार संघटनांकडून आंदोलन मागे, कोणत्या मागण्या झाल्या मान्य?
VIDEO | एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कामगार संघटनेकडून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय मागे, कोण-कोणत्या मागण्या झाल्या मान्य, बघा व्हिडीओ
मुंबई, १२ सप्टेंबर २०२३ | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कामगार संघटनेकडून एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, यावेळी त्यांनी राज्य सरकारला दोन दिवसांचं अल्टिमेटम देखील दिलं होतं. मात्र त्यापूर्वीच एसटी कामगार संघटनेकडून आंदोलन मागे घेण्यात आले आहे. महागाई भत्त्यासंदर्भातील आणि इतर मागण्यांसंदर्भात एसटी कामगारांकडून हे आंदोलन पुकारण्यात आले होते. दरम्यान, राज्य सरकारकडून या मागण्या मान्य झाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ३८ टक्के मिळणारा महागाई भत्ता आता ४२ टक्के इतका थकबाकीसह मिळणार आहे. काल मंत्री उदय सामंत यांच्यासह एसटी कामगारांच्या शिष्टमंडळासह सह्याद्रीवर सकारात्मक बैठक पार पडली होती. त्यानंतर आता महागाई भत्त्यासंदर्भातील मागणी मान्य झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.