विधानसभेची पुन्हा मतमोजणी होणार? EVM वर शंका अन् ‘या’ 24 उमेदवारांची निवडणूक आयोगाकडे धाव

| Updated on: Dec 01, 2024 | 10:10 AM

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इव्हीएममध्ये काहीतरी बिघाड झाल्याचा पराभूत झालेल्या उमेदवारांने संशय व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या २४ उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आयोग काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागलंय

विधानसभेच्या निकालावरून विरोधकांनी ईव्हीएम आणि मतमोजणीवरून शंका व्यक्त केली. तर आता तब्बल २४ उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. या २४ उमेदवारांनी मतदानाच्या निकालासह मजमोजणीवर शंका घेतली असून पुन्हा मतमोजणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. यामध्ये संगमनेरचे काँग्रेस उमेदवार बाळासाहेब थोरात, पुणे कॅन्टोनमेंटचे उमेदवार रमेश बागवे, कर्जत जामखेडचे भाजप उमेदवार राम शिंदे, नगर शहर अभिषेक कळमकर, पारनेरच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राणी लंके, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राहुरीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे, कोपरगावचे संदीप वरपे, विक्रमगडचे सुनील भुसारा, हडपसरचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप, शिरूरचे अशोक पवार, खडकवासल्याचे सचिन दोडके, चिंचवडचे राहुल कलाटे, पवार गटाचे तुमसरचे उमेदवार चरण वाघमारे, अणुशक्तीनगरचे फवाद अहमद, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोपरी पाचपाखाडीचे उमेदवार केदार दिघे, ठाणे शहरचे उमेदवार राजन विचारे, ओवळा माजिवड्याचे नरेश मणेरा, डोंबिवलीचे दीपेश म्हात्रे, ऐरोलीचे एम. के. मडवी, बविआचे वसईचे उमेदवार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे उमेदवार क्षितीज ठाकूर बोईसरचे उमेदवार राजेश पाटील यांचा समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे.

Published on: Dec 01, 2024 10:03 AM
शपथविधी ठरला, देवेंद्र फडणवीस CM होणार पण ‘गृहखात्या’वरून टक्कर अन् ‘2 नंबर’ची लढाई सुरू
ईव्हीएम अन् ‘लाडकी बहीण’वरून बाबा आढावांचा सवाल, ‘महिलांना भाऊबीज म्हणत मग स्वतःच्या…’