बौद्धविहार पाडून मंदिरं, मशिदी उभारल्या; ज्येष्ठ अभ्यासक डॉ. प्रदीप आगलावे यांचा दावा
येथील मंदिराचा इतिहास, येथील भिंतींवरील मूर्ती आदी गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला जावा. तसेच ते पुरोहितांकडून बौद्ध लोकांच्या हाती द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी केली आहे.
वाराणसी येथील ज्ञानवापी मशीदीच्या परिसरात हिंदु देवी देवतांच्या मूर्ता सापडल्याचा दावा केला जातोय. त्यासाठी सर्वेक्षणही केले जात आहे. याच धर्तीवर पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरावरही अभ्यास होण्याची गरज आहे. येथील मंदिराचा इतिहास, येथील भिंतींवरील मूर्ती आदी गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला जावा. तसेच ते पुरोहितांकडून बौद्ध लोकांच्या हाती द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक आणि डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी केली आहे.