अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टवर हातोडा, तोडकाम सुरू
दापोली येथील रिसॉर्टवर कारवाई सुरु असून बेकायदा बांधकाम केल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील एका कंपनीला या पाडकामाचं कंत्राट देण्यात आलं आहे. अनिल परब आणि सदानंद कदम यांचा विरोधात दापोली पोलिस स्टेशन 14 नोव्हेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल झाला होता
ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाच्या पाडकामाला सुरूवात करण्यात आली आहे. दापोली येथील रिसॉर्टवर कारवाई सुरु असून बेकायदा बांधकाम केल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील एका कंपनीला या पाडकामाचं कंत्राट देण्यात आलं आहे. अनिल परब आणि सदानंद कदम यांचा विरोधात दापोली पोलिस स्टेशन 14 नोव्हेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टचा मुद्दा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लावून धरला होता. या ठिकाणी बेकायदेशी बांधकाम करुन गुन्हेगारी कृत्य केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. दापोलीमधील मुरूड समुद्रकिनाऱ्यावर अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हॉटेल आहे. या ठिकाणी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या आरोपानंतर ही कारवाई करण्यात येत आहे.