Mumbai | मुंबईत ऑगस्ट महिन्यात डेंग्यू, मलेरियाची रुग्णसंख्या वाढली

| Updated on: Sep 02, 2021 | 10:42 AM

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून आता कुठे सावरत असलेल्या मुंबईवर आता नवं संकट ओढावलं आहे. सध्या मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे. सातत्याने बदलणारे वातावरण आणि पाऊस या दोन्ही रोगांच्या प्रसारासाठी पोषक ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून आता कुठे सावरत असलेल्या मुंबईवर आता नवं संकट ओढावलं आहे. सध्या मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे. सातत्याने बदलणारे वातावरण आणि पाऊस या दोन्ही रोगांच्या प्रसारासाठी पोषक ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात मुंबईत मलेरियाचे 790 तर डेंग्यूचे 132 रुग्ण सापडले आहेत. यंदा शहरात आतापर्यंत डेंग्यूच्या एकूण 209 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर जानेवारी ते ऑगस्टदरम्यान मलेरियाच्या 3,338 रुग्णांची नोंद करण्यात आली. याशिवाय, गेल्या आठ महिन्यांत गॅस्ट्रोच्या 1,848 रुग्णांची नोंद झाली.

जानेवारी महिन्यापासून मुंबईत मलेरियाचे 3,338, लेप्टोस्पायरोसिसचे 133 रुग्ण, डेंग्यूचे 209, गॅस्ट्रो आजाराचे 1,848 रुग्ण आढळून आले आहेत. तर काविळीचे 165 आणि स्वाईन फ्लू आजाराचे 45 रुग्ण सापडले आहेत. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण डोंगरी (बी), परळ(एफ साऊथ) आणि वांद्रे पश्चिम(एच पश्चिम) या भागांत आढळले आहेत.

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 2 September 2021
Solapur | उजनी धरणक्षेत्रात पर्यटनस्थळ विकसित होणार