आगामी निवडणुकांच्या निमित्तानं ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी, ‘या’ 10 नेत्यांवर कोणत्या विभागाची जबाबदारी?
संघटनात्मक बांधणीसाठी ठाकरे गटाची नवी रचना सुरू करण्यात येतेय. याकरता ठाकरे गटाच्या १० नेत्यांवर विभागवार बांधणीची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. तर जानेवारी महिन्यात राज्यव्यापी शिबीरासह जाहीर सभाही घेण्यात येणार
मुंबई, २७ नोव्हेंबर २०२३ : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. संघटनात्मक बांधणीसाठी ठाकरे गटाची नवी रचना सुरू करण्यात येतेय. याकरता ठाकरे गटाच्या १० नेत्यांवर विभागवार बांधणीची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. तर जानेवारी महिन्यात राज्यव्यापी शिबीरासह जाहीर सभाही घेण्यात येणार आहे.
- संजय राऊत यांच्यावर नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी, पुणे, शिरूर, बारामती, मावळ
- अनंत गीते यांच्यावर रायगड, मावळ, पनवेल, कर्जत आणि उरण
- भास्कर जाधव यांच्यावर नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर
- विनायक राऊत यांच्यावर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
- राजन विचारे यांच्यावर ठाणे, पालघर, कल्याण आणि भिवंडी
- विनायक राऊत यांच्यावर नांदेड, हिंगोली आणि परभणी या विभागाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे. बाकी कोणाकडे कोणता विभाग दिलाय बघा..