नारायण राणे रोमानियाला वुमानिया म्हणाले आणि कलगितुरा रंगला

| Updated on: Mar 03, 2022 | 11:46 PM

रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून तिथे असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारही प्रयत्नशील आहे.

रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यापासून तिथे असणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकारही प्रयत्नशील आहे. यावेळी काही भारतीय विद्यार्थी युक्रेनमधून मायदेशी परतले तेव्हा मंत्री नारायण राणे विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी विमानतळावर गेले. यावेळी रोमानिया असा उच्चार न करता, वुमानिया असा उच्चार नारायण राणे यांनी केला. त्यावरुन उपमुख्यमंत्री अजि पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगला. अजित पवार यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही दिवसांची आठवण काढून दिली. त्यावेळी ते म्हणाले की, कुणी काय बोलले आहे ते जुने व्हिडिओ काढून बघा म्हणजे कळेल असं म्हणत अजित पवार यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.