शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवार यांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

| Updated on: Aug 25, 2023 | 5:06 PM

VIDEO | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा संधी न देण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांची एका वाक्यात प्रतिक्रिया देत कायदा आणि नियम काय सांगतो हेच पत्रकारांना सांगितलं

पुणे, २५ ऑगस्ट २०२३ | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी अजित पवार हे आमचे नेते आहेत. राष्ट्रवादीत फूट पडली नाही असं विधान केलं आणि अवघ्या पाच तासातच शरद पवार यांनी युटर्न घेतला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. या सर्व घडामोडींवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली असता त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. अजित पवार म्हणाले, ‘तुम्ही मागचं उकरून काढायला बसलाय का? ताजं काही बोलायला बसलाय? मला त्याबाबत बोलायचं नाही रे, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं आणि नो कमेंट्स’… अशी थेट प्रतिक्रिया माध्यामांना दिली. तसेच तुम्हाला जसा प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तसा कायद्याने, संविधानाने, नियमाने मला नो कॉमेंट्स म्हणण्याचा अधिकार आहे, असं खोचकपणे अजित पवार माध्यमांच्या प्रतिनीधींना प्रतिक्रिया देताना म्हणाले.

Published on: Aug 25, 2023 05:06 PM
शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्याचं मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत, म्हणाले…
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत धूसफूस? पक्षात पडली फूट? सुप्रिया सुळे यांनी काय केला पुनरुच्चार?