Ajit Pawar | पुण्यात 1ली ते 8वी शाळा बंंद राहणार, लसीकरणासाठी 9वी आणि 10वी चे वर्ग सुरु राहतील- पवार

Ajit Pawar | पुण्यात 1ली ते 8वी शाळा बंंद राहणार, लसीकरणासाठी 9वी आणि 10वी चे वर्ग सुरु राहतील- पवार

| Updated on: Jan 04, 2022 | 8:50 PM

पुणे शहर आणि जिल्ह्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्गांचे ऑनलाईन क्लास सुरु राहतील. तर 9वी आणि 10वीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीनेच सुरु राहणार आहेत.

पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव पुन्हा एकदा वाढताना पाहायला मिळत आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतेय. त्याचबरोबर ओमिक्रॉनबाधित (Omicron) रुग्णांची संख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार(Ajit Pawar) , आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून, निर्बंध अधिक कडक केले जाणार आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातील 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्गांचे ऑनलाईन क्लास सुरु राहतील. तर 9वी आणि 10वीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीनेच सुरु राहणार आहेत. कारण, या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करायचे आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिलीय. तर उद्या, परवापर्यंत कॉलेजबाबतचा निर्णय होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Rajesh Tope | लॉकडाऊन पर्याय नाही आणि लॉकडाऊनसारखी परिस्थितीही नाही-राजेश टोपे
Ajit Pawar | कोरोनाची परिस्थिती बिकट होत आहे, लोकांना विनंती आहे कठोर निर्णय घ्यायला लावू नका – पवार