मुंबईतील ‘मंगळागौर’ कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांची हजेरी, बघा कोणतं गायलं सुरेल गाणं?

| Updated on: Aug 12, 2023 | 10:44 PM

VIDEO | भाजप आमदार भारती लव्हेकर यांनी वर्सोवा मतदारसंघात मंगळागौर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची नऊवारी साडीत हजेरी अन् गायलं हे सुरेल गाणं!

मुंबई, १२ ऑगस्ट २०२३ | मुंबईतील वर्सोव्यातील नव्या पिढीला आपली परंपरा समजावी, जुने खेळ आजच्या पिढीला समाजावेत यासाठी वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या भाजप आमदार व ‘ती’ फाऊंडेशनच्या अध्यक्षा भरती लव्हेकर यांनी श्रवण सोहळा मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन जोगेश्वर पश्चिम येथे करण्यात आले होते. या मंगळागौरीच्या पारंपारिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी नऊवारी साडीसह पारंपारिक तयारीत उपस्थिती लावली. या कार्यक्रमात त्यांनी सुंदर उखाणा घेतला आणि आपल्या सुंदर अन् सुमधूर आवाजात मोगारा फुलला हे सुरेल आवाजात गाणं गायलं आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी बोलताना त्यांनी मंगळागौरीचा कार्यक्रम आहे आणि मंगळागौर कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिली. स्त्रीशक्तीचा जागर या ठिकाणी होतोय. महिला सक्षमीकरण या माध्यमातून होतंय याचा मला आनंद आहे, असं मतही व्यक्त केले.

Published on: Aug 12, 2023 10:44 PM
नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन, पण विरोधकांना वेगळीच शंका, बघा स्पेशल रिपोर्ट
पुण्यातील सोहळ्यात शिंदे यांच्या नावाची खुर्ची, पण शिंदे यांची गैरहजेरी; काय कारण? बघा स्पेशल रिपोर्ट