Ajit Pawar | केंद्रानं पाठवलेले पाहुणे गेले की उत्तर देईन : अजित पवार

| Updated on: Oct 08, 2021 | 6:29 PM

अजित पवार यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया देणे टाळले. मात्र, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना ते मिश्किलपणे पाहुणे असे म्हणाले. तसेच ही चौकशी संपली की पूर्ण पुराव्यानिशी बोलतो, असेदेखील अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या कपन्यांवर आयकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही चौकशी सुरुच आहे. या सर्व प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया देणे टाळले. मात्र, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना ते मिश्किलपणे पाहुणे असे म्हणाले. तसेच ही चौकशी संपली की पूर्ण पुराव्यानिशी बोलतो, असेदेखील अजित पवार म्हणाले.

अजित पवार आज कोरोनाविषयक आढावा बैठकीसाठी पुणे दौऱ्यावर होते. बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांची आयकर विभागमार्फत सुरु असलेल्या चौकशीवर भाष्य केले. “आता सध्या चौकशी सुरु आहे. आयकर विभाग त्यांचं काम करणार आहे. सध्या काम सुरु आहे. हे काम जेव्हा संपेल तेव्हा मी या संदर्भात बोलेन. आजसुद्धा हे काम सुरु आहे. आयकर विभागाला कोणत्याही कंपनीवर रेड टाकण्याचा अधिकार आहे. यामध्ये काय योग्य आहे ? काय अयोग्य आहे ? कॅश सापडतात का ? याची ते चौकशी करतात. त्यांची चौकशी करुन ते जातील. मग मी यावर भाष्य करेल,” असे अजित पवार म्हणाले.

Fast News | 4 PM | महत्वाच्या बातम्या | 8 October 2021
Aryan Khan Case : आर्यन खानचा जामीन अर्ज किल्ला कोर्टानं पुन्हा फेटाळला!