Ajit Pawar | ‘अरे मुख्यमंत्र्यांची तरी खुर्ची राहुद्या रे बाबा’ – अजित पवार

| Updated on: Dec 28, 2021 | 4:43 PM

अजित पवार यांनी आज विधानसभेत सदस्यांना शिस्तपालनावरून कान टोचले. सुरुवातीला मधुकरराव चौधरी अध्यक्ष असताना आम्ही आमदार होतो. तेव्हा केवढा दरारा असायचा. ते उभे असतील तर आम्ही क्रॉस करायचो नाही. आता तर आमच्या सीटवर कोणीही येऊन बसतो. मुख्यमंत्र्यांच्य खुर्चीवरही येऊन बसतात.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत बेशिस्त आमदारांना चांगलेच चिमटे काढले. आपण कसे वागतो याचं सदस्यांना जराही भान राहिलेलं नाही. सभागृहात येताना जाताना नमस्कार करायचा याचंही सदस्यांना भान राहिलं नाही. काही सदस्य तर एकदा निवेदन दिल्यानंतर पुन्हा दहा मिनिटाने निवेदन द्यायला येतात, असं सांगतानाच एक सदस्य तर थेट मुख्यमंत्र्यांच्याच खुर्चीवर येऊन बसला. शेवटी त्याला अरे बाबा, ही मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे. तेवढी तरी राहू दे असं म्हणण्याची वेळ आली, असं अजित पवार यांनी सांगितलं.

अजित पवार यांनी आज विधानसभेत सदस्यांना शिस्तपालनावरून कान टोचले. सुरुवातीला मधुकरराव चौधरी अध्यक्ष असताना आम्ही आमदार होतो. तेव्हा केवढा दरारा असायचा. ते उभे असतील तर आम्ही क्रॉस करायचो नाही. आता तर आमच्या सीटवर कोणीही येऊन बसतो. मुख्यमंत्र्यांच्य खुर्चीवरही येऊन बसतात. त्यांना म्हटलं तेवढी तरी राहू दे. तुला 145 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर बस. पण सदस्य ऐकत नाही, असं पवार म्हणाले.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 28 December 2021
Pune | आरोग्य विभागाचा गट ड प्रमाणे क गटाचाही पेपर फुटला, अमिताभ गुप्ता यांची माहिती