बाळासाहेबांना कस्टडीत ठेवण्याइतके अध्यक्ष पावरफुल, अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नीलम गोऱ्हे यांच्याकडून नराजी
VIDEO | उपसभापती यांना फक्त सभागृह चालवण्यापुरतेच अधिकार आहेत का?, विधान परिषदेत नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला सवाल
मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ परिसरात संगीत रजनी कार्यक्रम आयोजित केला. याला विधान परिषदेतील आमदारांनी आक्षेप घेतला. तसेच उपसभापतींच्या अधिकारावर गदा आणली जात आहे का ? असा सवाल देखील उपस्थित केला गेला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना कस्टडीत ठेवण्याइतके आपले अध्यक्ष पावरफुल आहेत, अशा शब्दात विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नीलम गोऱ्हे यांच्याकडून नराजी व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी सरकारच्यावतीने मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपसभापती यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैल चित्राचा दाखला देखील दिला. ‘बाळासाहेब ठाकरे यांचा प्रत्येकाला आदर आहे. आम्ही तर २५ वर्ष त्यांच्यासोबत काम केले. त्यामुळे त्यांचे तैल चित्र कुठले लागणार हे बघावसं वाटले. तरी मी ते सर्व लोकांबरोबर जेव्हा पडदा उघडला तेव्हा कुठले तैलचित्र आहे ते पाहिले. अधिकाऱ्यांवर माझी नाराजी नाही पण प्रत्येक अधिकाऱ्यांने मला सांगितले की चित्र कुठले लागणार ते फक्त अध्यक्षांना माहिती आहे. म्हणजे हिंदुहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे याना त्यांच्या कस्टडीत ठेवण्याइतके आपले अध्यक्ष पावरफुल आहेत ते मला त्यादिवशी कळलं.’, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.