कोकणानंतर फडणवीस-दरेकर उद्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, मोरगिरी-आंबेघरला भेट देणार
देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर

कोकणानंतर फडणवीस-दरेकर उद्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, मोरगिरी-आंबेघरला भेट देणार

| Updated on: Jul 27, 2021 | 10:45 PM

पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उद्या (दि.28) जुलै रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

मुंबई : राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे सातारा जिल्ह्यात अनेक भागात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहे. सातारा जिल्ह्यातील मोरगिरी, आंबेघर, हुंबरळी तालुक्यात महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) उद्या (दि.28) जुलै रोजी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

फडणवीस-दरेकर पुरग्रस्त नुकसानीचा तसंच परिस्थितीचा आढावा घेणार

सातारा जिल्ह्यात महापुराचा वेढा पडला असून बाजारपेठ, एसटी स्टँडसह शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं असुन मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. संध्या पुराचे पाणी ओसरले असून आता सर्वत्र चिखल झाला आहे. अनेक भागात दरड कोसळली असुन अनेक जण दगावले आहे. विरोधी पक्षनेते पुरग्रस्त नुकसानीचा व तेथील परिस्थितीचा आढावा घेण्याकरीता सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

दौऱ्याची सुरुवात मोरगिरी, आंबेघरपासून

दौऱ्याची सुरूवात मोरगिरी, आंबेघर तालुक्यातील पाटण गावापासुन होणार आहे. पाटण गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी दुपारी 2.45 वाजता करणार आहेत. मोरगिरी, आंबेघर तालुक्यातुन कोयनानगर येथील प्रथमिक केंद्र शाळा येथे स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांची संध्याकाळी 4.30 वाजता भेट घेणार आहेत. त्याचबरोबर हुंबरळी तालुक्यातील पाटण गावामधील अतिवृष्टीग्रस्त भागाची संध्याकाळी 5.15 वाजता पाहणी करणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

‘पवारांचं म्हणणं बरोबर पण दौरे केल्याने यंत्रणा कामाला लागते…’

राज्यात जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा मदतकार्य होणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे कोणत्याही नेत्यानं प्रसंगावधान राखलं पाहिजे. अशा प्रकारचे दौरे केल्याने यंत्रणा त्यांच्यासाठी फिरवावी लागते. ते योग्य नाही. त्यामुळे ज्यांचा या भागाशी दैनंदिन संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळावा, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. त्याबाबत माध्यमांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, फडणविसांनीही पवारांचा सल्ला योग्य असल्याचं सांगत आपला दौरा मात्र सुरुच ठेवणार असल्याचं म्हटलंय.

नुकतीच राणे-फडणवीस-दरेकरांकडून कोकणतल्या परिस्थितीची पाहणी

केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी रविवारी तळीये येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत येऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी नारायण राणे यांना गराडा घातला आणि आपलं गाऱ्हाणं मांडलं.

दादा, तुम्ही कोकणासाठी दैवत आहात. तुम्हीच आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता. आमचं सर्व काही पुरात वाहून गेलं आहे. आमचं कंबरडं मोडलं आहे. आम्हाला तातडीने मदत करा, अशी मागणी या व्यापाऱ्यांनी केली. तसेच, अलोरा येथे काही नियोजन केल्यास पुराचं पाणी समुद्राज जाऊ शकतं. त्यामुळे पुराचा प्रश्न कायमचा सोडवला जाऊ शकतो, असं या व्यापाऱ्यांनी राणेंना सांगितलं.

(Devendra fadanvis and Pravin Darekar Visit Satara District Flood Affected Area)

हे ही वाचा :

Maharashtra Flood : पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याबाबत पवारांच्या आवाहनाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर! काय म्हणाले फडणवीस?

Sharad Pawar : महाराष्ट्राला महापुराचा तडाखा; शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील 5 महत्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

Taliye Landslide : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून उद्ध्वस्त तळीये गावची पाहणी, मदतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन

Published on: Jul 27, 2021 10:45 PM
Special Report | उजणी धरणावर सकर माशांचं संकट
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 28 July 2021