‘देवेंद्र फडणवीस दुसरा बॉम्ब टाकणार’ Chandrakant Patil यांचा इशारा

| Updated on: Mar 13, 2022 | 7:25 PM

केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला त्रास देता का?, मग आम्ही तुम्हाला त्रास देतो असं म्हणून हे सर्व सुरू आहे. त्यातील एक व्हिडीओ बॉम्ब देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) टाकला. दुसरा व्हिडीओ बॉम्ब येतो आहे. एका व्हिडीओ बॉम्बने सगळं चिडीचूप झालं. दुसरा व्हिडीओ बॉम्ब तर खूपच स्ट्राँग आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला त्रास देता का?, मग आम्ही तुम्हाला त्रास देतो असं म्हणून हे सर्व सुरू आहे. त्यातील एक व्हिडीओ बॉम्ब देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) टाकला. दुसरा व्हिडीओ बॉम्ब येतो आहे. एका व्हिडीओ बॉम्बने सगळं चिडीचूप झालं. दुसरा व्हिडीओ बॉम्ब तर खूपच स्ट्राँग आहे. त्यामुळे आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही घारबणारे लोक नाहीत. चळवळीतील लोक आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठी संपूर्ण भाजप (bjp) आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं. त्यामुळे संपूर्ण जनता त्यांच्या पाठी आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील (chandrakant patil) मीडियाशी संवाद साधत होते. फडणवीस माजी मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री आहेत. ते विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना काही घटनात्मक अधिकार आहे. संरक्षण आहे. त्यामुळे त्यांना सोर्स विचारले जाऊ शकत नाहीत, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

Published on: Mar 13, 2022 07:20 PM
Sanjay Raut मर्द शिवसैनिक आहे, घाबरण्याचा प्रश्नच नाही, राऊतांचं नवीन ट्विट
सरकार सुडबुद्धीने कारवाई करतंय – Chandrashekhar Bawankule