Devendra Fadnavis | महाराष्ट्रातील कारखान्यांना नवसंजीवनी मिळेल, दिल्लीतून देवेंद्र फडणवीस

| Updated on: Oct 19, 2021 | 6:38 PM

राज्यातील ज्या साखर कारखान्यांना नोटीसा आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार नाही. त्याबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.

राज्यातील ज्या साखर कारखान्यांना नोटीसा आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार नाही. त्याबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सकारात्मकता दर्शवली आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे सहकारी कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे आज सहकार क्षेत्रावर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह राज्यातील भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली. सहकारी कारखानदारी माहीत असेलेले प्रमुख लोक होते.

सकारात्मक आणि सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी मिळेल अशी बैठक झाली. सहकारी साखर कारखान्यांना आयकराच्या नोटीस येत आहेत. एफआरपीला जास्त दर दिल्याने या नोटिसा येत आहेत. त्यामुळे सातत्याने हा मुद्दा बाहेर येतो. आताही नोटीस आल्या आहेत. याचा कायम इलाज करावा अशी मागणी अमित शहांकडे करण्यात आली. त्यावर शहांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. कुणावरही कारवाई होणार नाही असं त्यांनी सांगतिलं. या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं. या निर्णयामुळे सहकारी कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या 20 वर्षापासून कारखान्यांना त्रास होत होता. त्यातून मार्ग निघेल, असं फडणवीस म्हणाले.

Afghanistan | अफगाणिस्तानच्या 50 जणांचा जीव घेणाऱ्या मशिदीतला बाँब ब्लास्ट Live
Raosaheb Danve | अमित शाहा यांच्याशी राज्यातल्या साखर कारखान्याच्या अडचणीबाबत चर्चा : रावसाहेब दानवे