Devendra Fadnavis : ‘पराभवाची जबाबादारी माझी, मला मोकळं करा’, उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांवर कोणती जबाबदारी?

| Updated on: Jun 06, 2024 | 12:05 PM

पक्षासाठी पूर्ण वेळ संघटनात्मक काम करून विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर ते प्रदेशाध्यक्ष होणार का? अशी चर्चा देखील रंगताना दिसतेय.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे. इतकंच नाहीतर यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे. पक्षासाठी पूर्ण वेळ संघटनात्मक काम करून विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर ते प्रदेशाध्यक्ष होणार का? अशी चर्चा देखील रंगताना दिसतेय. निकालातून समोर आलेल्या आकड्यांवरून भाजप २३ खासदारांवरून थेट ९ आकड्यांवर आली. त्याचीच जबाबदारी स्वीकारून फडणवीसांनी विधानसभा निवडणुकीसाठी मंत्रीमंडळातून बाहेर पडण्याचा वैयक्तिक निर्णय घेतला. यानंतर सध्या हा चेंडू अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या कोर्टात आहे. मात्र महाराष्ट्रात ४५ अधिकची घोषणा भाजपने केली होती. मात्र जनतेने महायुतीला १७ वरच रोखलं. महायुतीला १७ जाहा तर महाविकास आघाडीली ३१ जागा मिळाल्यात एक अपक्ष सांगलीतून विजयी झाला असला तरी तो उमेदवार काँग्रेसचा असल्याने मविआचाच हा अपक्ष एक भाग आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 06, 2024 12:05 PM
Modi 3.0 : नरेंद्र मोदीच होणार PM; नितीश-चंद्राबाबू NDA सोबत, पंतप्रधान पदावर शिक्कामोर्तब
Eknath Khadse : टायगर अभी जिंदा है… नाथाभाऊंच्या ‘त्या’ जाहिरातीने खान्देशात चर्चांना उधाण