‘हे काय सुरू आहे?’, विधिमंडळात देवेंद्र फडणवीस आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये खडाजंगी, कुणी काय केला आरोप?

| Updated on: Feb 27, 2023 | 4:50 PM

VIDEO | विधिमंडळात देवेंद्र फडणवीस आणि भास्कर जाधव आमने-सामने, जाधव यांच्या 'त्या' आरोपाला उपमुख्यमंत्र्यानी काय दिलं उत्तर?

मुंबई : राज्याच्या विधिमंडळात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मुद्यावर चर्चा असताना भाजप आणि मविआ आमने-सामने आलेत. भास्कर जाधव यांनी पॉईट ऑफ प्रोसिजर मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतल्याचे पाहायला मिळाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भास्कर जाधव धमकी देत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. यावेळी भास्कर जाधव यांनी माझा पॉईट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाही, असा आरोप करत काय चाललंय असा प्रश्नही केला. यावर देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Feb 27, 2023 04:50 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेळगाव महत्त्वाचा दौरा, जंगी स्वागत अन् बघा रोड शोची एक झलक
थेट सॅटेलाइटद्वारे EVM नियंत्रित करतात, ठाकरे गटाच्या नेत्यानं कुणावर केला खळबळजनक आरोप?