देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे ‘हे’ 10 ते 15 मंत्री 5 डिसेंबरला घेणार शपथ, बघा कोणा-कोणाचा समावेश?

| Updated on: Dec 01, 2024 | 2:12 PM

येत्या ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्यासह १० ते १५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. तर शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरूण आमदारांचाही समावेश आहे.

येत्या ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी होईल अशी माहिती आहे. मुंबईतील आझाद मैदानावर ५ डिसेंबर रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. कोणती खाती कोणाकडे असावी? मंत्रिमंडळ कसं असावं? कोणाकडे कोणती खाती असणार याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांसह किमान २० जणांचा शपथविधी होणार असल्याची शक्यता वर्तविली जात असताना आता येत्या ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्यासह १० ते १५ मंत्री शपथ घेण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. तर शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये ज्येष्ठ आणि तरूण आमदारांचाही समावेश आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह शपथ घेणाऱ्या भाजपच्या संभाव्य मंत्र्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा, अतुल सावे, आशिष शेलार, पंकजा मुंडे, देवयानी फरांदे, नितेश राणे, गोपीचंद पडळकर आणि संजय कुटे यांचा समावेश आहे. दरम्यान, महायुतीला शपथविधी सोहळा हा भव्य करायचा आहे. कारणं या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री अशी अनेक लोकं या शपथविधीसाठी उपस्थितीत राहू शकतात.

Published on: Dec 01, 2024 02:09 PM
‘शिंदे दाढीवरून हात फिरवतात तेव्हा काहीतरी घडतं, दाढीला हलक्यात…’, शिवसेनेच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार ‘ही’ ९ मंत्रिपदं, संभाव्य खाती आली समोर, गृहखातं असणार?