संघटनात्मक बैठकीसाठी मी आणि चंद्रकांत पाटील दिल्लीत – देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत. आज त्यांनी भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे नेते बीएल संतोष आणि सीटी रवी यांची भाजप मुख्यालयात भेट घेतली.
पक्षांच्या नेत्यांसोबत पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाली आहे. मात्र, पक्षात कोणताही संघटनात्मक बदल होणार नाही, असं महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महाराष्ट्र भाजपमधील संघटनात्मक फेरबदलावरच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं सांगितलं जात आहे.
देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत. आज त्यांनी भाजपचे नेते अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे नेते बीएल संतोष आणि सीटी रवी यांची भाजप मुख्यालयात भेट घेतली. या नेत्यांमध्ये सुमारे चार ते पाच तास चर्चा झाली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना फडणवीस यांनी ही माहिती दिली.