‘सुधारणा करा नाहीतर…’, भाजप आमदारांचं थेट रिपोर्ट कार्ड; फडणवीस-बावनकुळे यांच्याकडून समज

| Updated on: Sep 09, 2023 | 12:49 PM

VIDEO | राज्यातील सर्व विधानसभा भाजप आमदारांना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट हातात दिले त्यांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड अन् म्हणाले सुधारणा करा नाहीतर कठीण आहे.

मुंबई, ९ सप्टेंबर, २०२३ | राज्यातील भाजपच्या सर्व विधानसभा सदस्य म्हणजेच आमदाराचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आले आहे. भाजपच्या प्रत्येक आमदाराच्या हातात हे रिपोर्ट कार्ड देऊन सुधारणा करा नाहीतर कठीण आहे, असे म्हणत भाजप नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून यासर्व आमदारांना समज देण्यात आली आहे. भाजप आमदारांचं हे रिपोर्ट कार्ड खासगी संस्थांच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. तर भाजपच्या प्रत्येक आमदारांना देण्यात आलेलं हे रिपोर्ट कार्ड ६० पानांचं आहे. ६० पानांच्या या रिपोर्ट कार्डमधून आमदारांना आरसा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यासाठी गरवारे क्लबमध्ये दिवसभर मॅरेथॉन बैठका घेतल्या. यावेळी प्रत्येक आमदाराशी ते वैयक्तिक बोलले असल्याचे सांगितले जात आहे.

Published on: Sep 09, 2023 12:49 PM
Mega Block | मुंबईकरांनो उद्या घराबाहेर पडताय? तिनही रेल्वे मार्गावर कसा असणार ब्लॉक?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मुंबईला पाणीपुरवठा करणारे ‘हे’ ४ तलाव ओव्हरफ्लो