कुणामागे कोण? आरोपांमुळे एकच खळबळ तर शरद पवार अन् राजेश टोपे यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांचं बोट?

| Updated on: Feb 28, 2024 | 12:41 PM

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अधिकाऱ्यांनाच शिवीगाळ केल्यानंतर त्यांच्या मागे नेमका कुणाचा हात आहे? हा विषय तापलाय. सरकार एकीकडे म्हणतंय की, जरांगेंची शिवीगाळ, असंसदीय शब्द यांचा आम्ही निषेध करतो तर विरोधक म्हणताय शिवीगाळ, असंसदीय शब्दांचं आम्ही देखील समर्थन करणार नाही

कुणामागे कोण? आरोपांमुळे एकच खळबळ तर शरद पवार अन् राजेश टोपे यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांचं बोट?
Follow us on

मुंबई, २८ फेब्रुवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील सहकाऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शरद पवार आणि राजेश टोपे यांच्याकडे बोट दाखवलं आहे. यावर काल रेकॉर्ड सिद्ध झाले आणि एक टक्काही दोष निघाला तर राजकारण सोडून देऊ, असं आव्हानच राजेश टोपे यांनी दिलंय. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह अधिकाऱ्यांनाच शिवीगाळ केल्यानंतर त्यांच्या मागे नेमका कुणाचा हात आहे? हा विषय तापलाय. सरकार एकीकडे म्हणतंय की, जरांगेंची शिवीगाळ, असंसदीय शब्द यांचा आम्ही निषेध करतो तर विरोधक म्हणताय शिवीगाळ, असंसदीय शब्दांचं आम्ही देखील समर्थन करणार नाही. दरम्यान, जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे याची एसआयची चौकशी करणार असल्याचे सरकारने म्हटलंय. तर निश्चितपणे चौकशी करा पण जरांगेंसोबत सरकारच वाटाघाटी करत होतं याचं उत्तर द्या…इतकंच नाहीतर आंदोलनाची सुरूवात लाठीचार्जने झाली त्यांचं काय? असा सवालही विरोधकांनी उपस्थित केलाय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट