Nandurbar | देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास, चर्चांना उधाण

| Updated on: Sep 18, 2021 | 3:38 PM

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री के सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल उपस्थित आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये (Aurangabad) युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्याचा पुढचा अंक नंदुरबारमध्ये पाहायला मिळणार का याची उत्सुकता आहे. कारण आज सत्ताधारी तिन्ही पक्षातील दिग्गज नेते आणि विरोधी भाजपतील नेते एकाच मंचावर आहेत. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि सहकार महर्षी पी.के आण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री के सी पाडवी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल उपस्थित आहेत. महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि मंत्री जयंत पाटील हे या कार्यक्रमासाठी एकाच गाडीतून आले.

दरम्यान या पुतळ्याचे अनावरण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, यांच्यासह खानदेशातील सर्वच राजकीय नेते उपस्थितीत राहणार आहेत.

Radhakrishna Vikhe Patil | राजकारणात कोणीच मित्र आणि शत्रू नसतात, त्यामुळे काहीही चमत्कार होऊ शकतो
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 17 September 2021