कंत्राटी नोकरभरती रद्द, पण सत्ताधारी-विरोधकांच्या तंट्याला ‘भरती’
tv9 Marathi Special Report | कंत्राटी भरती रद्द झाली असली तरी आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा नव्याने भरती आल्याचे पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा कंत्राट भरतीचा निर्णय रद्द केला तेव्हा अजित पवार का नव्हते? असा सवाल करत विरोधकांनी केला हल्लाबोल
मुंबई, २२ ऑक्टोबर २०२३ | कंत्राटी भरती रद्द झाली असली तरी आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा नव्याने भरती आल्याचे पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा कंत्राट भरतीचा निर्णय रद्द केला तेव्हा अजित पवार का नव्हते? असा सवाल करत विरोधकांनी युती काळातील जीआर दाखवत हल्लाबोल केलाय. इतिहासात असं पहिल्यांदा घडतंय की एखादं सरकार गेल्या काही महिन्यांपासून कंत्राट भरती करतं. ज्याविरोधात विरोधकांसह तरुणही आंदोलन करतात. नंतर विद्यमान सरकार कंत्राट भरती रद्द करतं. यानंतर मात्र कंत्राटीची पद्धत याआधीच्या सत्ताधाऱ्यांनी सुरु केली असं म्हणत आत्ताचे सत्ताधारीच आंदोलन करतात. फडणवीसांनी कंत्राट भरतीवरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं. मात्र यात फडणवीसांनी याआधीच्या सरकारमध्ये कॅबिनेटमध्ये मंत्री असलेले अजित पवारांचं नाव वगळून राष्ट्रवादीचा उल्लेख शरद पवारांची राष्ट्रवादी असा केला. कंत्राटीचं पाप हे विरोधकांचंच आहे असं म्हणत फडणवीसांनी कंत्राट भरती रद्द केली. बघा स्पेशल रिपोर्ट…