कुणीही पक्ष सोडू नका, भाजपची पडझड रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुणे महापालिकेच्या मैदानात
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिका निवडणुकीत लक्ष घातल्याचं कळतंय. पक्ष सोडू नये अशा सूचना फडणवीस यांनी नगरसेवकांना केल्या आहेत
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे महापालिका निवडणुकीत लक्ष घातल्याचं कळतंय. पुणे महापालिकेतील भाजप नगरसवेक पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्या पार्श्वभूमीवर आपली सत्ता आली की चांगली पदं मिळतील, कुणीही पक्ष सोडू नका, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केल्याचं सूत्रांकडून कळतंय.