‘देवेंद्र’ 3.0, बस नाम ही काफी है… दिल्लीत मुख्यमंत्रिपदाबाबत फडणवीसांच्या नावावर मोहोर

| Updated on: Nov 30, 2024 | 11:02 AM

शिवसेनेकडून किमान दोन वर्ष तरी मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी मोठे प्रयत्न झालेत. पण १३२ आमदारांच्या तगड्या संख्याबळामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर टिकली नाही. त्यामुळे पूर्ण ५ वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार सत्तेत येणार आहे.

राज्याचा मुख्यमंत्री कोण हे निकालानंतर ठरवू असं महायुतीचे तिनही नेते म्हणत होते. त्यानुसार दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. आता फक्त आमदारांच्या बैठकीत नेता निवड होऊन औपचारिकता पूर्ण होईल. महायुती आणि भाजपला विधानसभेत छप्पर फाडके यश मिळालं. या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालंय. दिल्लीत अमित शहांसोबतच्या महायुतीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावासमोर शिक्कामोर्तब झालं हे सांगण्यासाठी हा फोटो खूप बोलका आहे. अमित शहांना बुके देताना देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव दिसत नाहीत. आता केंद्रातील निरीक्षकांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत नेता निवड करून औपचारिक मोहोर उमटवण्यात येईल. शिवसेनेकडून किमान दोन वर्ष तरी मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी मोठे प्रयत्न झालेत. पण १३२ आमदारांच्या तगड्या संख्याबळामुळे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर टिकली नाही. त्यामुळे पूर्ण ५ वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार सत्तेत येणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती विशेषतः भाजपला जबर फटका बसला. त्यातच उद्धव ठाकरे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन तू राहशील नाहीतर मी राहिल.. असं म्हणत खुलं आव्हान दिलं.

Published on: Nov 30, 2024 11:02 AM
‘…तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार’, भाजप तयार नाही अन् एकनाथ शिंदे अडून बसले
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 डिसेंबरला? दिल्लीत ठरलं कोणाकडे कोणती खाती जाणार?