देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?

| Updated on: Mar 14, 2022 | 8:20 PM

वक्फ बोर्डाच्या सदस्याने एका महिलेवर बलात्कार केल्याचा पेनड्राईव्ह बॉम्ब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी टाकल्याने विधानसभा पुन्हा एकदा हादरली. त्याही पुढे जात महाविकास आघाडी सरकाने डॉ. मुदस्सीर लांबेसारखी चक्क दाऊची माणसे वक्फ बोर्डात नियुक्त केल्याचा खळबळजनक दावा फडणवीसांनी केला.

वक्फ बोर्डाच्या सदस्याने एका महिलेवर बलात्कार केल्याचा पेनड्राईव्ह बॉम्ब विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी टाकल्याने विधानसभा पुन्हा एकदा हादरली. त्याही पुढे जात महाविकास आघाडी सरकाने डॉ. मुदस्सीर लांबेसारखी चक्क दाऊची माणसे वक्फ बोर्डात नियुक्त केल्याचा खळबळजनक दावा फडणवीसांनी केला. वक्फ बोर्डातली ही माणसे नवाब मलिकांची खास आहेत. त्यामुळे पर्यायाने मलिक यांचे दाऊदशी संबंध आहेत, असा रोख फडणवीसांच्या बोलण्यात होता.

फडणवीस म्हणाले की, अर्थसंकल्पात काही गोष्टी कमी जास्त होतील, पण बॉम्बस्फोटात असलेल्यांना वक्फ बोर्डावर घेणे कितपत योग्य आहे. या वक्फ बोर्डातील सदस्यांचा बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिमशी संबंध आहे. तरीही हा माणूस वक्फ बोर्डात कसा? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. वक्फ बोर्डाच्या सदस्याच्या संवादाचा एक व्हिडिओच फडणवीसांनी पेनड्राईव्हमधून विधानसभा अध्यक्षांना दिला. या प्रकरणातील एक जण तुरुंगात आहे. त्याच्या मोबाइलमध्ये सर्व संभाषण आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घ्या आणि कारवाई करा, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.

वक्फ बोर्डावर नियुक्त केलेले लंबे निवडून आलेत
अमजद खान, निजामुद्दीन शेख, हिना साळुंखे नेमकं कोण? वळसे-पाटलांनी फोन टॅपिंग प्रकरणातील नेत्यांची टोपण नावं सांगितली