Devendra Fadnavis Video | सर्व मंत्र्यांना चांगली खाती मिळाली, महाराष्ट्राला याचा चांगला फायदा होणार : देवेंद्र फडणवीस
बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राला चांगले खाते मिळाले आहेत. याचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल, असे फडणवीस म्हणाले.
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. यामध्ये राज्याच्या वाट्याला चार मंत्रिपंद आली. यामध्ये एक कॅबिनेट तर तीन राज्यमंत्रिपदं आहेत. नारायण राणे, भागवत कराड, भारती पवार आणि कपिल पाटील अशी या चार मंत्र्यांची नावे आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राला चांगले खाते मिळाले आहेत. याचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल, असे फडणवीस म्हणाले. राणे यांना मंत्रिपद देताना त्यांच्या क्षमतेचा विचार करण्यात आला आहे. बाकी कोणत्याही गोष्टीवर विचार करण्यात आलेला नाही, असेही फडणवीस यांनी सांगितलं.