भावी मुख्यमंत्री राज ठाकरे? देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा, बघा काय म्हणाले?
VIDEO | राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केले आहे. मनसे नेत्यानं केलेल्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, 'ज्या पक्षातील लोकांना आपले नेते भावी मुख्यमंत्री होतील असे वाटते त्यांना शुभेच्छा'
मुंबई, २ ऑक्टोबर २०२३ | भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि रोहित पवार यांचे लागल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर भावी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचंही नाव घेतलं जात आहे. मनसेच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य मनसे नेते अभिजीत पानसे यांनी केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसे नेत्यांची बैठक बोलावली होती. याबाबत माहिती देताना अभिजीत पानसे म्हणाले की, ‘संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती. काही दिवसांपूर्वी सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याची जबाबदारी दिली होती. याचा आढावा यावेळी घेण्यात आला. तर प्रत्येक मुद्यांवरून मनेसेने आंदोलनं केली. त्यामुळे जनतेत मनसेच्या बाजूने वातावरण आहे. राज ठाकरे लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत त्यासाठी आम्ही काम करायला लागलो आहोत’, असेही पानसे म्हणाले. दरम्यान, यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ज्या पक्षातील लोकांना आपले नेते भावी मुख्यमंत्री होतील असे वाटते त्यांना शुभेच्छा दिल्यात.