शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; देवेंद्र फडणवीसांनी थेट तारीख अन् कारण सांगितलं

| Updated on: May 08, 2024 | 3:42 PM

शरद पवार यांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया समोर येत आहे. शरद पवार यांनी केलेल्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर अनेक छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असा दावा शरद पवार यांनी केला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया समोर येत आहे. शरद पवार यांनी केलेल्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, शरद पवारांना आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर काँग्रेसमध्ये जावं लागेल. त्यांना आपला पराभव दिसू लागलाय. त्यामुळे येत्या ४ जूनपर्यंत शरद पवारांचा गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट काँग्रेसमध्ये विलीन झालेला पाहायला मिळेल, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तर ४ जूनपर्यंत ठाकरे गट आणि शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होतील आणि त्यांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे, असं शरद पवार यांनी सांगितल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

Published on: May 08, 2024 03:42 PM
इथं लोक कडाक्याच्या उन्हानं हैराण अन् भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या? कुठे घडला प्रकार?
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल