Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून उद्धव ठाकरेंना केलं थेट टार्गेट

| Updated on: Dec 04, 2024 | 2:03 PM

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपलं पहिलं वहिलं भाषण केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

गटनेतेपदी निवड झाल्यानंतर विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपलं पहिलं वहिलं भाषण केलं. यावेळी त्यांनी निवडणुकीत मिळालेल्या यशाचं श्रेय राज्यातील जनतेला दिलं. तर उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘२०१९ रोजी जनतेचा कौल मिळाला होता. पण दुर्देवाने तो हिसकावून घेतला गेला. जनतेसोबत बेईमानी झाली. त्या इतिहासात जात नाही. आपल्याला नवी सुरुवात करत आहोत. अडीच वर्षात आपल्याला त्रास दिला, आमदारांना त्रास दिला. अशा परिस्थिती अभिमान आहे, या अडीच वर्षात विरोधात बसलो पण एकही आमदार सोडून गेला नाही. सर्व आमदार नेते संघर्ष करत होते. त्यातूनच २०२२ मध्ये आपलं सरकार आलं. त्यातूनच आज आपल्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. भाजपला १३२ आणि महायुतीला २३७ जागा मिळाल्या. हा महाराष्ट्रातील अभूतपूर्व यश आहे. मोदींचं आभार मानेल. बुथचा कार्यकर्ता म्हणून, वॉर्डाचा कार्यकर्ता म्हणून काम केलं. अशा व्यक्तीला तीन वेळा मुख्यमंत्रीपदावर बसवलं. एकदा ७२ तासांसाठी होतो. पण टेक्निकली मुख्यमंत्री होतो. हा पक्ष मोठा झाला. त्यांनी संधी दिली. मी मोदींचं आभार मानतो’, पुढे ते असेही म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचेही आभार मानतो. ज्यांनी या निवडणुकीत अतिशय ताकदीने राज्यात तळ ठोकून कार्यकर्त्यात ऊर्जा निर्माण केली, आपल्याला ताकद दिली ते गृहमंत्री अमित शाह यांचं आभार मानतो.

Published on: Dec 04, 2024 02:03 PM