कोण होतास तू काय झालास तू…, देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
VIDEO | नागपूरच्या सावरकर गौरव यात्रेतून देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित आक्रमकपणा वाढल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना खालच्या पातळीत शब्दोच्चार केले. यावरून भाजपही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यालाच प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात जोरदार हल्लाबोल केला. “तुम्ही मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या मुखपत्राने लेख छापला. म्हणाले, स्वातंत्र्यवीर नाही माफीवीर, सावकरांनी बलात्कार केला होता, इतकं भयानक लिहिलं होतं. पण यांना खुर्चीची चिंता होती. साधा निषेध सुद्धा केला नाही. ते ज्यावेळेस महाराष्ट्रात आले त्यावेळेस त्यांच्या गळ्यात गळे घालून त्यांच्यासोबत पायी चालत होते. म्हणून म्हटलं कोण होतास तू काय झालास तू…”, अशी टीका करत देवेंद्र फडणवीस यांनी सवाल उपस्थित केला.