शरद पवार यांचा पक्ष आल्यापासून पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहत आहेत – देवेंद्र फडणवीस

| Updated on: Dec 12, 2021 | 11:41 PM

देवेंद्र फडणवीसांना अमोल कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या पंतप्रधानपदाबाबतच्या मुद्दावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी फडणवीसांनी 'माझ्या पवारांना खूप शुभेच्छा आहेत. स्वप्न पाहणं हे काही वाईट नाही. त्यांच्या पार्टीच्या जन्मापासून ते स्वप्न पाहत आहेत. पण त्यांचा पक्ष 10 चा आकडाही पार करु शकला नाही. त्यामुळे मला वाटतं की ठीक आहे. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा', अशा शब्दात खोचक टोला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त आज मुंबईत पक्षाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे असा सूर उमटल्याचं पाहायला मिळालं. खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, ‘शरद पवार यांनी देशाचे नेतृत्व करावे. जर गुजरातमध्ये 26 खासदार असताना एक व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकते. मग 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातून शरद पवारही पंतप्रधान होऊ शकतात’. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात उमटलेल्या या सूराबाबत जोरदार टीका केलीय.

देवेंद्र फडणवीसांना अमोल कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या पंतप्रधानपदाबाबतच्या मुद्दावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी फडणवीसांनी ‘माझ्या पवारांना खूप शुभेच्छा आहेत. स्वप्न पाहणं हे काही वाईट नाही. त्यांच्या पार्टीच्या जन्मापासून ते स्वप्न पाहत आहेत. पण त्यांचा पक्ष 10 चा आकडाही पार करु शकला नाही. त्यामुळे मला वाटतं की ठीक आहे. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’, अशा शब्दात खोचक टोला लगावला आहे.

Special Report | राहुल गांधींच्या वक्तव्यावरून नवा वाद
Kirit Somaiya | मुंबई महापालिकेचा 100 कोटींचा घोटाळा उघड करणार : किरीट सोमय्या