Breaking | मावळमध्ये गोळीबार हेच जालियनवाला होतं- फडणवीस, जालियनवालामधलं दृश्य यूपीत पाहिलं- पटोले
मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का? लखीमपूर घटना निंदनीय आहेच. पण मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केला गेला. त्यावेळी त्यांना जालियनवाला बाग आठवला नाही का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली आहे. इतकंच नाही तर आपण हे वक्तव्य केल्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कार्यालये आणि नातेवाईकांवर आयकर विभागाची छापेमारी सुरु असल्याचा आरोपही पवारांनी केलाय. पवारांच्या या आरोपाला आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. लखीमपूर हिंसाचाराच्या निषेध म्हणून राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.
मावळमध्ये पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का? लखीमपूर घटना निंदनीय आहेच. पण मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार केला गेला. त्यावेळी त्यांना जालियनवाला बाग आठवला नाही का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. आजचा बंद आहे हा ढोंगीपणाचा कळस आहे. त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्नही फडणवीसांनी विचारलाय.