पालिकेतील सत्ताधारी Mumbai ला सोनं देणारी कोंबडी समजतात- Devendra Fadnavis
मुख्यमंत्र्यांचं भाषण छोटं होतं पण छान होतं. ते म्हणाले की गरीब, गरजू, कामगारांना द्यायचं आहे पण इथं फक्त लुटीचं काम सुरु आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली आहे. यावेळी फडणवीसांनी कोविड सेंटर घोटाळ्यांवरही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
मुंबई : मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. मुंबई महापालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महापालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं आणि ज्यांचा क्रमांक देशात आठवा आहे. त्यांचा फायनान्सियल रिसोर्स मॅनेजमेंटचा आकडा 45 वर आहे. आपल्यापुढे नवी मुंबई, पुणे, नागपूरसुद्धा आहे. कशाप्रकारे महापालिकेचं बजेट लुटून नेण्याचं काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचं भाषण छोटं होतं पण छान होतं. ते म्हणाले की गरीब, गरजू, कामगारांना द्यायचं आहे पण इथं फक्त लुटीचं काम सुरु आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली आहे. यावेळी फडणवीसांनी कोविड सेंटर घोटाळ्यांवरही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.