सुरतेची ‘लूट’ झाली नाही? ‘तो’ शब्द काँग्रेसने आणला, देवेंद्र फडणवीसांचा दावा वादात

| Updated on: Sep 02, 2024 | 10:39 AM

सुरतेवर शिवाजी महाराज यांनी कधीच लूट केली नाही. असं विधान केल्यानंतर ते एक आक्रमण होतं. मात्र काँग्रेसने लूट हा शब्द शिकवला, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यांनी केलेल्या याच दाव्यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत भाजपला सवाल केलेत.

शिवरायांच्या पुतळा दुर्घटेनेच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीसांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुस्तकाचा विषय छेडल्यानंतर आता इतिहासावरून वाद रंगताना दिसतोय. नेहरूंनी शिवाजी महाराजांच्याबद्दल डिस्कव्हरी ऑफ इंडियात जे लिहिलंय त्याबद्दल ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. यानंतर काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांना इतिहास नीट अभ्यासन्याचा सल्ला दिला. तर फडणवीसांनी दुसरा मुद्दा मांडला शिवाजी महाराजांनी सुरतेवर लूट नाही तर आक्रमक केलं होतं. मात्र काँग्रेसने त्याला सुरतेची लूट असं सांगून काँग्रेसने खोटा इतिहास शिकवला. कर्नाटक आणि मध्यप्रदेशातील उदाहरण देत देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की, काँग्रस सरकारने दोन्ही राज्यात शिवाजी महाराजांचे पुतळे हटवले गेले. तेव्हा महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी का गप्प होती? यावरूनही त्यांनी सवाल उपस्थित केले. मध्यप्रदेशात काँग्रेसने बुलडोझर लावून शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला त्यावर पवार ठाकरे मूग गिळून बसले आहेत. त्यावर का बोलत नाही कर्नाटकात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने महाराजांचा पुतळा हटवला. त्याबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. आधी त्याचं उत्तर दिलं पाहिजे, असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

Published on: Sep 02, 2024 10:39 AM
पाण्याचा प्रवाह अन् पुलावरील खड्ड्यांमुळे कार अर्धी बुडाली अन्…
Maharashtra Rain : मराठवाडा-विदर्भात मुसळधार पावसाचा रूद्रावतार, कोणत्या भागाला झोडपलं?