कांदाप्रश्नी राष्ट्रवादी अन् भाजपात श्रेयवाद सुरु? थेट जपानमधून देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार नेमकं काय केलं?
VIDEO | कांद्याच्या प्रश्नासंदर्भात आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु, राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या भेटीपूर्वी जापान दौऱ्यावर असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं?
नवी दिल्ली, २२ ऑगस्ट २०२३ | राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने 40 टक्के शुल्क आकारलं आहे. त्याविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशातच आता कांद्याच्या प्रश्नी आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याच दिसत आहे. दरम्यान, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि मंत्री पियुष गोयल फोन केले व त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. देवेंद्र फडणवीस सध्या जापान दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असतानाही त्यांनी फोनवरूव या मंत्र्याशी संवाद साधत मोठा निर्णय घेण्यास पुढाकार घेतलाय. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल, असे ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.