लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला की नाही? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच म्हटलं…

| Updated on: Nov 28, 2023 | 10:56 AM

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार भाजप २६ जागा लढणार असा फॉर्म्युला फडणवीस यांनी सांगितला आणि शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात चलबिचल सुरू झाली. तर पुन्हा प्रतिक्रिया देत फडणवीसांनी ही चलबिचल शांत करण्याचा प्रयत्न केला.

Follow us on

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३ : देवेंद्र फडणवीस यांनी भाजप २६ जागा लढवणार असं सांगितलं. यानंतर शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात खलबतं सुरू झालीत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर स्पष्टीकरण देत अंतर्गत चर्चा शांत करण्याचा प्रयत्न केला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार भाजप २६ जागा लढणार असा फॉर्म्युला फडणवीस यांनी सांगितला आणि शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात चलबिचल सुरू झाली. तर पुन्हा प्रतिक्रिया देत फडणवीसांनी ही चलबिचल शांत करण्याचा प्रयत्न केला. जागा वाटपाचा फॉर्म्युला हा ठरलेला नाही पण विद्यमान खासदारांच्या जागा हाच जागावाटपाचा बेस असेल, असेही त्यांनी स्पष्ट सांगितलं. महाराष्ट्रातील ४८ लोकसभेच्या जागांचं सर्वेक्षण झालं आहे. लोकसभेसाठी भाजप जवळपास २६ जागा तर शिवसेना अन् राष्ट्रवादी २२ जागा लढतील, असं फडणवीस म्हणाले. बघा नेमकं काय म्हणाले…?