Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची थेट गृहमंत्रीपदाची मागणी, काय आहे प्रकरण?

| Updated on: Nov 09, 2023 | 2:58 PM

राज्याचे गृहमंत्री फक्त पक्ष फोडण्यात मग्न आहेत. तुम्ही गृहमंत्री म्हणून अपयशी आणि नापास झालात, गृह खात्याकडे फडणवीसांच दुर्लक्ष झालं आहे. गृहखात्याचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सुषमा अंधारे यांचा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात

पुणे, ९ नोव्हेंबर २०२३ | देवेंद्र फडणवीस गृहखातं संभाळण्यासाठी अपयशी आहेत, असा थेट घणाघात ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. इतकंच नाही तर तुम्हाला संभाळता येत नसेल तर राज्याचे गृह खातं माझ्याकडे द्या, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलाय. तर राज्याचे गृहमंत्री फक्त पक्ष फोडण्यात मग्न आहेत. तुम्ही गृहमंत्री म्हणून अपयशी आणि नापास झालात, गृह खात्याकडे फडणवीसांच दुर्लक्ष झालं आहे. गृहखात्याचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तुमच्या अब्रूची लक्तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात टांगली गेली आहे. आमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणारे मंत्री गप्प का? असा सवालही सुषमा अंधारे यांनी केला आहे. सुषमा अंधारे यांनी आज सकाळी व्हिडीओ ट्वीटकरत जोरदार हल्लाबोल केला तर व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चेहरे देखील स्पष्ट दिसत आहेत. पाकीट नेमकी कसली दिली गेली? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली.

Published on: Nov 09, 2023 02:57 PM
Hasan Mushirf : हसन मुश्रीफ मंत्रिपदाचा राजीनामा देणार? संजय राऊत यांच्या ‘त्या’ आरोपांवर नेमकं काय म्हणाले?
मने सदा गौरव छे…मुख्यमंत्री शिंदे यांनी वाचली पंतप्रधान मोदी यांची कविता अन् केलं तोंडभरून कौतुक